आ. चिमणराव पाटलांनी घेताना मतदार संघातील प्रलंबित कामाचा आढावा

0
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यासाठी दुष्काळी अनुदान एकूण १२ कोटी आले त्यापैकी ११ कोटींचे अनुदान वाटप झाले आहे उर्वरित आणखी किती अनुदान शासना कडून येणे बाकी आहे त्याला काय अडचण आहे या बाबत ही आढावा महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी वर्गा कडून जाणून घेत शासन आपले आहे तालुक्याच्या शेतकरी सामान्य जनतेच्या कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत सर्व कामे ही टप्याटप्याने मार्गी लावली जातील असे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी या वेळी दिले.
मतदार संघातील  जी कामे  निधी अभावी आणि  कागदपत्राच्या त्रुटी अभावी प्रलंबीत आहे अश्या कामांचा आढावा आमदार चिमणराव पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेऊन माहिती जाणून घेत या हिवाळी अधिवेशनात या पैकी महत्वाच्या कामांची प्रश्न उपस्थित करीत ते मार्गी लावण्याचा प्रयन्त केला जाईल असे  आमदार चिमणराव पाटील यांनी बोलून दाखविले . पारोळा येथील तहसिल कार्यालयात आढावा बैठकीत अधिकारी वर्गा सोबत माहिती घेतांना ते  बोलत होते.  या बैठकीस तहसिलदार अनिल गवांदे , सहाय्यक गट विकास अधिकारी अहिरे पोलिस उपनिरीक्षक , आदि  अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी आ . चिमणराव पाटील यांनी प्रत्येक विभागाच्या कार्याचा आढावा जाणून घेत मतदार संघातील पाझर तलाव , रोजगार हमी योजनाचे   बंद असलेल्या कामे,रस्त्यांच्या कामाची स्तिथी   सुरु व अडचणी मुळे बंद असलेल्या कामे या बाबत माहिती घेत प्रलंबित असलेल्या कामांना शासना कडून  निधीची तरतुद करता येईल का ? तालुक्यातील रखडलेले पाझर बन यांनी त्या त्या विभागातील अधिकारी वर्गाला सूचना केल्यात

Leave A Reply

Your email address will not be published.