लोक उद्धार फाउंडेशन …आधार देणारी माणसे

0

११ मार्च २०२१ महाशिवरात्रीचे औचित्य साधून लोक उद्धार फाऊंडेशन चा अsभ्यास गट आत्ताच यावर्षी नवीनच ग्रामपंचायत झालेली चैतन्य तांडा क्रमांक ४ (करगाव) या तांड्यात प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेली असता  ग्रामपंचायत मार्फत तांड्यात झालेली  प्रगती व  विविध विकास कामे पाहण्यासाठी गेले असता मा. दिनकर भाऊ राठोड, गावातील सरपंच सौ. अनिताताई राठोड, उपसरपंच आनंदा शिवराम राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, भाऊलाल राठोड व ईतर सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व एकत्रित पणे काम करत आहे.

या गावाला शिवनेरी फाउंडेशन मार्फत जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामासाठी यावर्षी १.५० लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत खरोखरच दिसली प्रत्येक घराजवळ शोष खड्डे त्यामुळे गावात रस्त्यावर कुठेही पाणी   सांडलेले दिसले नाही ते पाणी  शोषखड्डयाच्या  माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात जात होते. अतिशय बोलके अशी शौचालय केलेले आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते, रस्ता कॉक्रिटीकरण, चौदाव्या वित्त आयोगातील सार्वजनिक शौचालय व मुतारी त्यासोबतच गावात विविध ठिकाणी रंगरगोटी करून स्लोगन, जल बचतीचे मंत्र, काही ठिकाणी शैक्षणिक चित्र, वृक्ष लागवडीचे चित्र रंगवुन तसेच स्वच्छतेचे महत्त्व लोकांना सांगितले आहे. दिनकर भाऊंच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास होत आहे.

त्यांच्या माध्यमातून पुढील येणाऱ्या भविष्यात चैतन्य तांड्या मध्ये शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा मानस आहे त्यात पोलीस भरतीसाठी, नोकरी व स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणे एक शैक्षणिक चळवळ उभी करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये माईक ची व्यवस्था केलेली आहे त्या माईक मधून पूर्ण गावात शासनाची  कोणतीही योजना आली की त्या माईकच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते. ग्रामपंचायत च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे. त्यात आवक – जावक रजिस्टर, योजनांची माहिती असलेले रजिस्टर, पेपरमधील कात्रणे, त्यांच्या भविष्यात खुप चांगल्या कल्पना ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्याचा मानस आहे. एकंदरीत पाहता लोक उद्धार फाउंडेशन च्या टिमला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली व त्यांच्या या चांगल्या कामाचा फायदा ते इतर गावात किंवा सामाजीक काम  करतांना मदत होईल एवढाच शुद्ध हेतू आहे. आपण म्हणतो आदर्श गाव पाटोदा, हिरवे बाजार, राळेगण सिद्धी या गावांचा आदर्श डोळ्यासमोर  ठेवून काम करतो परंतु आपल्या चाळिसगावा मध्येच अशा प्रकारचे आदर्श गाव निर्माण झाले तर काय वाईट आहे.  भविष्यात चैतन्य तांडा क्र.४ (करगाव) हे गाव आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही असे मनोमन वाटते. यासाठी सर्व ग्रामस्थांची मदत निश्चितच गरजेची आहे.

आजच्या या अभ्यास  दौऱ्यासाठी लोक उद्धार फाउंडेशन चे सरचिटणीस भरत पवार, संचालक मंडळ रवि राठोड,  गोकुळ राठोड सर, अर्जुन चव्हाण, कुणाल चव्हाण ही सर्व लोक उद्धार फाउंडेशन ची टिम उपस्थित होती.

Leave A Reply

Your email address will not be published.