लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा ; एकता फाउंडेशनची मागणी

0

फैजपूर (प्रतिनिधी) । लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी एकता फाउंडेशन फैजपूरच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एक ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.

विविध समाजघटकांकडून या मागणीबाबत जोर धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान यांनी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान, उपाअध्यक्ष अजय मेढे, सचिव मुदस्सर शेख, शेख आसिफ घनश्याम चंदनशिव, भूषण मेढे, मोहसीन शेख, मुजाहिद नासीर, मोहसीन शब्बीर शेख, शेख इस्माईल मुजाहिद, गफ्फार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.