लोकप्रतिनिधींकडूनच सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली

0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात दाखल झाले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर ना.टोपे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं सोबत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित झाले असून गटागटाने उभे आहेत. या लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाडले जात नसल्याचे चित्र आहे.

आरोग्यमंत्र्यां सोबतच्या बैठकीसाठी आमदार राजू मामा भोळे, आ.मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. प्रत्येक जण आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत गटाने चर्चा करतांना दिसत असून कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच लोकप्रतिनिधींकडून होणारा हा प्रकार पाहून सामान्यांकडून काय अपेक्षा करावी? अशी उपरोधिक चर्चा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.