लॉकडाऊनमध्ये जिल्हा बँकेचे एटीएम कार्ड ठरताहेत कुचकामी

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गिरड येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांच्या ग्राहकांना जिल्हा बँकेचे रुपेचे एटीएम कार्ड दिलेले आहेत परंतु ते लॉक डाऊन कालखंडात ग्राहकांना ते एटीएम कार्ड कुचकामी ठरताना दिसत आहे. ग्राहकाला जर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्या खात्यातील पैसे एटीएम टू एटीएम ट्रान्सफर करायचे असतील तर ते होत नाहीत तसेच समजा एखाद्या दूध वाल्याला किंवा सामान्य किराणा दुकानदाराला त्याच्याकडे स्वॅप कार्डसाठी मशीन नाही त्याच्या खात्यावर पैसे टाकायचे असतील ते देखील टाकता येत नाही .त्यामुळे ह्या एटीएम कार्डाचा लॉक डाऊनकाळात उपयोग होताना दिसत नाही.

तरी यासाठी पे फोन, गुगल पे ,पेटीएम मध्ये वापर करताना वेगवेगळ्या बँकांचे नाव त्या ठिकाणी येत असतात तसेच आपल्या बँकेची देखील त्याठिकाणी निवड यादीत नाव असले पाहिजे म्हणजे निवड करता आली पाहिजे यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अद्ययावत होणे आवश्यक आहे यासाठी स्वतंत्र शाखे वाईज आय.एफ.एस.सी कोड बँकेचा स्वतंत्र असला पाहिजे म्हणजे ग्राहकाला चांगल्या प्रकारे एटीएम कार्डचा वापर करता येईल याकडे जिल्हा बँकेचे चेअरमन रोहिणी खडसे (खेवलकर) सह संचालक मंडळाने याकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा जिल्हा बँकेचे ग्राहक दुसऱ्या बँकेचे ग्राहक होण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. तरी एटीएम कार्ड धारकांना ऑनलाइन घर बसल्या अधिकाधिक एटीएम कार्डचा कसा वापर होईल यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे या परिसरातील बँकेचे ग्राहक मागणी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.