जि.के देशमुख पगारदार नोकरांच्या पतसंस्थेमार्फत ११ हजार १११ रूपयांची मदत

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी )कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन देखील कोरोनालाआळा घालून त्यावर मात करण्यासाठी सर्व तोपरी उपाययोजना करत आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.शासनाच्या मदतीत खारीचा वाटा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस चाळीसगाव येथील जी.के.देशमुख पगारदार नोकरांच्या पतसंस्थेच्या वतीने 11111रुपयांचा धनादेश 16एप्रील रोजी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला यावेळी चाळीसगाव चे तहसीलदार अमोल मोरे उपस्थित होते.यावेळीपतसंस्थेचे चेअरमन सी.सी.वाणी, सदस्य अजय देशमुख,आर.एस.रणदिवे, सचिव जितेंद्र जाधव हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.