पुण्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू ; आकडा 46 वर

0

पुणे। राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोज वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहर याबाबतीत सध्या आघाडीवर आहेत. पुण्यात देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्यानं चिंतेत आणखी भर पडत आहे. आज पुण्यातील ससून रुग्णालयात करोनामुळे आणखी २ जणांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 वर्षीय पुरूष व कोंढवा येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याचबरोबर शहरातील एकूण मृतांचा आकडा 46 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. आज दुपारपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.