लॉकडाउनचा फायदा घेत चोरट्यांनी उभ्या तीन लक्झिरीमधून २ लाखांचा ऐवज चोरला

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- जामनेर रोडवरील हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील साईबाबा मंदिरा जवळील आवारात लॉकडाउन दरम्यान उभ्या असलेल्या तीन लक्झरीमधून २ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना येथे बुधवार ९ सप्टेंबर रोजी येथे घडली.

सी.सी.टी. व्ही.कॅमेऱ्यांच्या सहारे तपास सुरू
देशभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे प्रवास व प्रवासी वाहने बंदच होते. यामुळे शहरातील श्री.समर्थ कृपा ट्रॅव्हल्स, भैरवनाथ ट्रॅव्हल्स व जय भवानी ट्रॅव्हल्सच्या मालकांनी आपल्या लक्झरी बस गाडया जामनेर रोडवरील हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोरील साईबाबा मंदिरा जवळील आवारात उभ्या केल्या होत्या.

दरम्यान तीन लक्झरी मधून दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना मालकांच्या निदर्शनास आली . यामध्ये श्री.समर्थ कृपा ट्रॅव्हल्स मालक किशोर माळी राहणार शिव कॉलनी यांची एम.एच.४६ जे ०६०७,भैरवनाथ ट्रॅव्हल्स मालक हेमंत ठाकरे राहणार शिव कॉलनी यांची एम.एच ०४ जी.पी.९७९६,जय भवानी ट्रॅव्हल्स मालक रोहित रोकडे राहणार शिव कॉलनी यांची एम.एच०४ एफ.के.३६६१ या तीन लक्झरीमधून एल.सी.डी, म्युझिक सिस्टम अंदाजे २ लाखांचा ऐवज दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने आलेल्या अंदाजे ५ अज्ञात इसमांनी चोरुन नेला . ही घटना रात्री २.१५ ते २.५८ वाजे दरम्यान घडल्याचे
साईबाबा मंदिराच्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरी करून चोर नहाटा कॉलेजच्या रस्त्याने पोबारा होतांना सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

याप्रकरणी माहिती लक्झिरी मालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली.यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी दिनांक १० सप्टेंबर रोजी १२ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी पाहणी केली.यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून सहा पोलीस निरीक्षक मंगेश गोटले, गुन्हे शोध पथकाचे पोना रमण सुरळकर,प्रशांत परदेशी,वाहन चालक बंटी कापडणे यांनी भेट देऊन साईबाबा मंदिरावरील सी.सी.टी. व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.