लाहोरमध्ये महाराज रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना

0

लाहोर 

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे  तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की “हा अतिशय लाजिरवाणा प्रकार असून हा निरक्षर लोकांचा समूह जगातील पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी खरोखरच धोकादायक आहे”, असं हुसैन यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती हाताने पुतळ्याची तोडफोड करताना दिसत आहे. त्याने पुतळ्याचे हात तोडले आणि नंतर पुतळा घोड्यावरून खाली पाडला. तेवढ्यात एक माणून तिथं येतो आणि त्याला पकडून पुतळ्याची तोडफोड करण्यापासून थांबवतोय. दरम्यान, यापूर्वीही दोनदा या पुतळ्याची तेहरिक-ए- लब्बैक पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

महाराज रणजित सिंह यांनी पंजाबमध्ये शिखांचे बलाढ्य साम्राज्य निर्माण केले होते. इंग्रज ज्यांच्यासमोर चळचळ कापत असत. ते जो पर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या राज्यांकडे डोळे वर करून पाहण्याची किंवा ते ताब्यात घेण्याची इंग्रजांची हिम्मत झाली नव्हती. त्यांनी पंजाबमध्ये ४० वर्ष राज्य केले. भारताच्या फाळणीत पंजाबचा काही भाग पाकिस्तानात गेला. त्यामध्ये लाहोर शहराचाही समावेश आहे.

लाहोर हे शहर भगवान रामाचा पुत्र लव याने वसविले होते. कालांतराने अपभ्रंश होऊन नंतर ते लाहोर असे झाले. याच लाहोर शहरात महाराजा रणजित सिंह यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पुतळा उभारण्यात आला. मंगळवारी पाकिस्तानातील तेहरिक ए लबाईक या कट्टर संघटनेच्या धर्माधानी लाहोरच्या किल्ला परिसरात आणि कडक सुरक्षेत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. अशा प्रकारे पुतळ्याची विटंबना करण्याची ही तिसरी वेळ असल्याने शीख धर्मीयांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

महाराजा रणजित सिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीदिनी जून २०१९ मध्ये हा अश्वारूढ ब्रॉन्झ धातूत पुतळा उभारला होता. तेव्हापासून कट्टर धर्मांध मुस्लिमांच्या डोळ्यात हा पुतळा सलत होता आणि आहे. यापूर्वी दोनदा पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळा उभारल्यानंतर केवळ दोन महिन्यात तेहरिक ए लबाईकच्या दोन कट्टरवाद्यांनी पुतळ्याची प्रथम विटंबना केली आणि नासधूस केली. त्याची डागडुजी आठ महिन्यात करण्यात आली. आता पुन्हा पुतळ्याची विटंबना झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.