लासूर पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त ; गुरांचा आरोग्याचा प्रश्न

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या लासूर येथे गुरांचा आरोग्याची हेळसांड होत असल्याचा प्रकार सुरू आहे.लासुर पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी नेहमी कर्तव्यावर हजर राहत नसल्याची तक्रार शेतकरी सागर मगरे यांनी लासुर ग्रामपंचायतीकडे अर्जाद्वारे केली आहे.

सद्यस्थितीत पावसाळा असल्याने गुरे ऋतूबदलाने गुरे वारंवार आजारी होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे त्यांचा उपचारासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.अगोदरच कोरोना रोगामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत जर गुरे दगावली तर यास जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जात केला आहे.

संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व्ही ए तडवी यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे गोरगावले गावाचा मुख्य चार्ज असल्याचे कळाले.तालुक्यातील मोठे गाव असतांना देखील पशुवैद्यकीय सध्या लासूर पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकार्यांचे पद रिक्त असून शेतकऱ्यांना इतर खासगी डॉक्टरांना पैसे देऊन उपचार करावा लागत असल्याने त्वरित रिक्त पद भरण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.