प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे निधन

0

इंदूर – इंदूर :– प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानं त्यांचे निधन झालं आहे. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. त्यांना मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी आज सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे.

‘अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे’ असं इंदौरी म्हणाले होते.तसंच, ‘मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं होतं.

परंतु, ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन दिवस उलटला नाही तेच  राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमी आली. कोरोनामुळे इंदौरी यांचे निधन झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर निमोनियामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा युवा शायर सतलज राहत यांनी सांगितले की, ‘नियमित तपासणीसाठी फक्त ते घरातून बाहेर पडत होते. मागील पाच सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. डॉक्टराच्या सल्ल्यानंतर एक्स रे काढण्यात आला होता. त्यात निमोनिया झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता कोरोनाची लागण झाल्याचं कळालं.’

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.