लाच घेतांना जिल्हा पुरवठा शाखेतील चौघांना पकडले

0

जळगाव (प्रतिनिधी) : मयत आजोबाच्या नावाने असलेले स्वस्त धान्य दुकान वडिलांच्या नावावर करण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या जिल्हा पुरवठा शाखेतील दोन महिला अव्वल कारकून, हमाल पुरवठा ठेकेदारासह अन्य एक अशा चौघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहात पकडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेत झालेल्या या कारवाईने खळबळ निर्माण झाली आहे. पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराबाबत नेहमीच बोलले जाते. मात्र, ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. लोचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे पुरवठा विभाग पोखरला गेल्याचे या कारवाईमुळे सिध्द झाले आहे. येथे प्रत्येक कामासाठी ‘वजन’ आवश्यक झाले असून विभागातील सर्वच या लाचखोरीत सहभागी रहात असल्याची चर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील तक्रारदार तरूणाच्या आजोबाचे भुसावळ येथे रेशन दुकान होते. आजोबाचे निधन झाल्यामुळे या दुकानाचा परवाना  आपल्या वडीलांच्या नावाने करून देण्यासाठी तक्रारदार तरूणाने जिल्हा पुरवठा शाखेत अर्ज दिला होता. मात्र, पुरवठा शाखेतील अव्वल कारकून प्रमिला भानुदास नारखेडे, पुनम अशोक खैरनार यांच्यासह हमाल पुरवठा करणारा ठेकेदार प्रकाश त्र्यंक पाटील या तिघांनी  संंधीत तरूणाकडे 40 हजारांची मागणी केली. यानंतर संंधीत तरूणाने जळगाव येथील लाचलूचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करण्यासाठी लाचलूचपत विभागाच्या पथकाने 11 ते 13 मार्च असे लगातार तिन दिवस या तरूणासोबत जिल्हा पुरवठा विभागात  हजेरी लावली. संंधीतांकडून लाचेची मागणी होत असल्याची खात्री झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संबंधीतांनी या गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी जवळील दुध डेअरी व्यावसायिक योगेश नंदलाल जाधव यांच्याकडे दण्यास सांगितले. योगेश नंदलाल जाधव हा लाचेची रक्कम आज दुपारी स्विकारत असतांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातील पुंरवठा शाखेतच करण्यात आली. हॅश व्हॅल्यूसह फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

ला.प्र.वि.नाशिकचे अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अधिक्षक जी.एम.ठाकूर, निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहा.पोलीस उप निरीक्षक रविंद्र माळी, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुरेश पाटील, सुनिल पाटील, पो.ना. मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, पो.कॉ. प्रविण पाटील, नासिर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्‍वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुरवठा अधिकारी हाजिर हो…! 

लाचलुचपत विभागाच्या आजच्या कारवाईत दोघा महिला अव्वल कारकून यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्यासह भागाची शक्यता पडताळून पाहिली जाईल. त्यांना चौकशीसाठी ोलावणार असल्याचे लाचलूचपत विभागाचे उप अधिक्षक जी.एम.ठाकूर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. दरम्यान, यानंतर तात्काळ पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांची चौकशी झाल्याचे वृत्त आहे. दोन महिला अव्वल कारकून पुरवठा अधिकार्‍यांना अंधारात ठेवून लाचेची मागणी करू शकतात का? असा प्रश्‍न आता उपस्थित होत असून दुपार पर्यंत कौतुका होत असलेल्या लाचलुचपत प्रतिंधक पथकावर सायंकाळ पर्यत संशय व्यक्त केला जाऊ लागला होता. पुरवठा अधिकार्‍यांना याप्रकरणातून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.