लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६, रा. रिधुर वाडा शनीपेठ) यांनी ५ हजाराची मागणी केली होती.

तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.