लाँकडाऊन मध्ये व्यवसाय करणाऱ्याचा नगरपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला, गुन्हा दाखल

0

शेंदुर्णी ता.जामनेर : सध्या करोनाला हरवण्यासाठी जळगांव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कडक लाँकडाऊन सुरू केले आहे. विशिष्ट वेळेतच काही अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. काल मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात लाँकडाऊन चे उल्लंघन करणाऱ्या विरोधात मैदानात उतरले होते. कारवाई करत खाटीक गल्लीत मास विक्रेत्यांवर कारवाई करत असतानाच एकाला राग आल्याने त्याने नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत धारदार शस्राने ह,ल्ला केला याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल शहरातील सर्व भागात मुख्याधिकारी यांनी धडक मोहीम राबविली होती.असंख्य दुकानदारांचे साहित्य, वजनकाटे,भाजीपाला जप्त करण्यात आला होता. खाटीक गल्लीत मास विक्री सुरू होती यावेळी कारवाई करत वजनकाटे जप्त करत असतानाच वाद निर्माण झाला व तो विक्रेता नगरपंचायत कर्मचाऱ्यावर धाऊन आला यात तो कर्मचारी किरकोळ जखमी झाला होता.यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे बराच जमाव जमला होता.रात्री नगरपंचायत कर्मचारी यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन हल्ला केल्याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात आरोपी गुड्ड खाटीक याच्या विरुद्ध गु.र.नं.१६५/२०२१ भादंवि.३५३,३३२,५०४,५०६,४२७,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पहुरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.