रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ कमी करावी

0

अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेर महाविकास आघडीच्या पदाधिकाऱ्यांकडून गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढ कमी करावी यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ ही दुपटीने झाली आहे.एकीकडे दोन हजाराची मदत शेतकऱ्यांना करणे व दुसरीकडे दोन्ही हातांनी खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना लुबाडणे.शेतकऱ्यांचा शेती व्यवसायासाठी लागणारे रासायनिक खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी अजुन तोट्यात जाणार तसेच सर्वसामान्य जनतेसाठी व दळणवळण साठी लागणारे पेट्रोल व डिझेल याची किंमत देखील जवळपास प्रति लिटर १०० रुपये गाठीत आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील त्रस्त झाली आहे.दैनंदिन कुटुंब चालविणारे सर्वसामान्य व्यक्तींना आजची गॅस दरवाढ ही न परवडणारी असुन सर्वसामान्य माणसाचे आर्थिक जीवन विस्कळीत झालेली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत त्यात हे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ लावण्यासारखेच आहे.

यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,सेनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, काँग्रेस चे प्रभारी तालुकाध्यक्ष बी.के.सूर्यवंशी,मुख्तार खाटीक,भागवत पाटील, सुरेश पाटील, विनोद कदम,तिलोत्तमा पाटील,संजय पाटील, पं.स.सदस्य प्रविण पाटील,निवृत्ती बागुल,नगरसेवक संजय पाटील शिवाजी पाटील,विजय प्रभाकर पाटील, एल.टी.पाटील, जितेंद्र राजपूत, रणजित पाटील, उमाकांत पाटील तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.