लसीकरण करणाऱ्या टीमचा शिवसैनिकांकडून सत्कार

0

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी : शेंदुर्णीत तिथीनुसार शिवजयंती मोठ्या जल्Bलोषात व मिरवणूक काढून साजरी केल्या जाते परंतु या वर्षी शासनाचे नियम पाळून शिवजयंती शिवसैनिकांनी साजरी केली

घरा-घरात शिवरायांच्या प्रतिमेची पुजा अर्चा करण्यात आली. छत्रपती च्या नियोजित पुतळा जागेच्या ठिकाणी जाऊन पूजा चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करणारे व दिवसभर कोरूना टेस्ट करणारे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ व फळे देत त्यांचे मनोबल व उत्साह वाढविण्यात आला .यावेळी बोलताना शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ सुनील अग्रवाल यांनी सांगितले की महाराष्ट्रात नाव लौकिक असणारी आरोग्य सेवा शेंदुर्णीत रुग्णांना मिळत आहे. लसीकरण शेंदुर्णीत सुरू झाले असून ज्यांचे नंबर येईल त्यांनी लसीकरण अवश्य करून घ्यावे. या वेळी युवा सेना अधिकारी अजय भोई, शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, सेनेचे ज्येष्ठ नेते बारकू जाधव, सुनील गुजर यांनी मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम यांनी सांगितले आरोग्यसेवा व लसीकरण ही आमची जबाबदारीच आहे.

परंतु आमचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या कडून होत असलेला सत्कार हा आम्हाला प्रेरणादायी राहील कोरोना रुग्ण संख्या मोठी असली तरी आमची टीम सक्षम पणे उभी आहे ,आमच्या सांगिक कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे ,

या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम, डॉ शुभम सावळे, डॉ आदित्य पाटील ,डॉ श्रद्धा पाटील, गजानन माळी, शोभा घाटे, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील ,डी एम मुर्तडकर, अनिरुद्ध रहाटे ,गजानन बारी, किशोर कांबळे, त्र्यंबक तंवर, ईश्वर कोळी सुनील शिवपुजे, सुनील लोखंडे आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या वेळी शिवसेना शहर संघटक सिद्धेश्वर पाटील , अशोक बारी, राजेंद्र पाटील  ,भूषण बडगुजर, रमेश भोसले ,खंडू बारी ,सागर बारी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Photo caption:आरोग्य केंद्रात वेद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचा फळे व फुले देउन सत्कार करताना  शिवसेनिक संजय सूर्यवंशी डा.सुनील अग्रवाल  व इतर

Leave A Reply

Your email address will not be published.