मा.आमदार शिरीष चौधरी यांच्यातर्फे अमळनेरात माफक दरात रेमेडिसीवर इंजेक्शन उपलब्ध

0

अमळनेर(प्रतिनिधी)-कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.

अश्या परिस्थितीत रुग्णांना रेमडीसिवर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असतांना मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांनी अमळनेरकरांसाठी “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीप्रमाणे इंजेक्शन माफक दरात उपलब्ध करून दिले.त्यानिमित्त विक्री केंद्रांवर भेट दिली असता केमिस्ट असो.चे अध्यक्ष मिलींद डेरे ,  सचिव प्रशांत पाटील , खजिनदार सचिन चोपडा, मोहसीन पठाण यांनी दादासाहेब श्री शिरिषदादा चौधरी यांचे शाल पुष्प देत सत्कार करून आभार मानले या प्रसंगी गटनेते बबली पाठक, माजी नगरसेवक सुरेश आबा चौधरी, पंकज चौधरी ,हरीषचंद्र पाटील,पराग चौधरी, गणेश पाटील,ब्रिजलाल पाटील,प्रमोद चौधरी ,सुरेश आबा चौधरी  आबु महाजन,चेतन चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.