रोबोटिक्स तंत्रज्ञान बदलणार भारतीय उद्योगांची दशा व दिशा- डॉ.गिरीष कुळकर्णी

0

भुसावळ (प्रतिनिधी)- रोबोटिक्स तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून यंत्र उद्योगाला संचलनाची प्रचंड ताकद प्राप्त करून देणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स सर्किट, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर यांच्या सूक्ष्म पुथ्थकरण व विश्लेषणाच्या क्षमतेतून रोबोटिक्स क्षेत्र एक मोठी झेप घेऊ पाहत आहे. यंत्र स्वतंत्ररित्या मानवाकडून नियंत्रित होण्यासोबतीने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या, सेन्सरच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेला सुद्धा विकसित करण्याची क्षमता ठेवतील. यांत्रिक रोबोटिक्सच्या बरोबरीनेच, कृत्रिम प्रज्ञा बाळगणारे व अंतर्भूत आज्ञावली असणारे रोबोट तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ञ मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक्स तंत्रज्ञानाची ही युती तंत्रज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक घटना किंवा मैलाचा दगड ठरतेय म्हणूनच रोबोटिक्स तंत्रज्ञान भारतीय उद्योगांची दशा व दिशा बदलवतील असे मत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात “रोबोटिक्स 2.0” च्या कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच रोबोटिक्सची प्रशस्त प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली. मायक्रोकंट्रोलर टेक्नॉलॉजी रोबोटिक्स तंत्रज्ञानात कश्या प्रकारे उपयोगी ठरते याबद्दल प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले गेले. इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची ओळख व प्रशिक्षण देणे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे निमंत्रक प्रा.धिरज अग्रवाल यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, प्रा.अविनाश पाटील, डॉ.जी.सी.जाधव, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.दीपक साकळे उपस्थित होते.

प्रैक्टिकल एक्सपोजरवर भर: प्रा.दीपक साकळे

भारतातील संशोधन संस्था तसेच इन्स्टिटयूट ऑफ हायर लर्निग येथील तज्ञांचे मार्गदर्शन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रैक्टिकल एक्सपोजर व प्रशिक्षण (उद्योगक्षेत्रातील गरजेनुसार व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार) पायाभूत व आधुनिक गरजांचे तंत्रज्ञान तसेच नवीन शिक्षण प्रणालीनुसार क्रॉस डिसीप्लिनरी, मल्टि डिसिप्लिनरी व ट्रान्स डिसिप्लिनरी विषयक ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी नियोजन गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेतले जाईल कारण रोबोटिक्स हे उद्योगाबरोबरीने वैद्यकीय क्षेत्र, सरंक्षण क्षेत्र तसेच अगदी सॉफ्टवेअर क्षेत्र सुद्धा काबीज करून राहिले आहे. आज रोबोटिक्स सगळ्यात मोठी उत्क्रांत होणारी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील शाखा आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलचे प्रात्यक्षिक देतांना प्रा.दीपक साकळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.