रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनानं निधन

0

नवी दिल्ली : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच  दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.  सुरेक्ष अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

११ सप्टेंबर रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सुरेश अंगडी ११ सप्टेंबरला करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांना दाखल केलं गेलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. करोनाने निधन झालेले ते कर्नाटकातील दुसरे खासदार आहेत. याआधी अशोक गस्ती यांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले. गस्ती हे राज्यसभेचे खासदार होते.

करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीतील एम्समध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेश अंगडी हे ६५ वर्षांचे होते. चार वेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.