रावेर शहरात दोन गटात हाणामारी

0

रावेर । प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात दगडफेक करण्यात आली. देशभरात जनता कर्फ्यु ! लागू असतांना घडलेला प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. संपुर्ण जिल्ह्यात शासनाच्या आदशानुसार कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्हातून या जनता कप’ला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनस्थळी दाखल झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.