रावेर दंगल घटनास्थळी नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट

0

रावेर । देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर शहरात दोन गटात तुफान दगफेक करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. या दगडफेकीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. तर दंगली संदर्भात एकूण 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे रावेर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दरम्यान, घटनास्थळी आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांनी भेट दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले मुक्काम ठोकून आहेत.

शहरातील शिवाजी चौक, बारी वाडा, मण्यारवाडा, संभाजी चौक भागात दगड विटा आणि बाटल्यांच्या काचेचा खच पडलेला आहे. रात्री आमदार शिरीष दादा चौधरी यांनी तर सकाळी खा रक्षा ताई खडसे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

दरम्यान, दंगलीतील मयत यशवंत कांशीराम मराठे याच्या शव विच्छेदननंतर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या सँभाजी नगरमधील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी नातेवाईक महिलांनी मोठा आक्रोश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.