जोगलखेडा येथे तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील जोगलखेडा येथे एका तरुणास मेन लाईनचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि २१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अनिल सुरेश राजपूत 32 राहणार ढेकू तालुका अमळनेर हा बांधकाम कारागीर असून त्याने जोगलखेडा येथील त्यांचं साडू समाधान पंढरीनाथ राजपूत यांचे घर बांधकाम साठी घेतलेले असताना त्या बांधकामावर आज स्टाईल बसवण्याचे काम सुरू असताना अनिल हा जोगलखेडा येथे आलेला होता त्यानंतर तो धाब्यावर असताना त्यास मेंन लाईनचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्याच गावातील ग्रामस्थांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर योगेश साळुंखे यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले याबाबत रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.