रायसोनी अभियांत्रिकीचे रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयात विलीनीकरण

0

जळगाव | प्रतिनिधी
येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट संचलित जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मेनेजमेंट महाविद्यालयाचे जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयात नुकतेच विलीनीकरण करण्यात आले आहे. विलीनीकरणाच्या प्रस्ताव सादरीकरणासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महराष्ट्र शासन यांची पूर्व संमती घेण्यात आली होती. त्यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेप्रमाणे या महाविद्यालयांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष २०१९/२० अंतर्गत जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट या महाविद्यालयात अभियांत्रिकी प्रथम वर्ष व एमबीए प्रथम वर्षाला प्रवेश करण्यात येतील. शिक्षण क्षेत्रातील होणारे बदल लक्षात घेऊन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना उत्तोमोत्तम शिक्षण मिळावे या धोरणाखाली विलीनीकरणाचा(मर्जर) निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सदरहू सादर प्रस्तावास नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच सदरहू झालेल्या विलीनीकरणामुळे जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मेनेजमेंट महाविद्यालयातील सुरु असलेले अभियांत्रिकीचे सर्व अभ्यासक्रम वर्ग झालेले असून नियमाप्रमाणे पूर्वरत सुरु राहतील.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण देणा-या महाविद्यालयांसाठी तंत्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत चालना-या संस्थेच्या इतर महाविद्यालयात विलीनीकरण करता येणार असल्याचे निर्देश दिले होते, काळानुसार होणारे बदल लक्षात घेता रायसोनी समूहाने देखील विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर केलेला होता. प्रस्ताव सादरीकरणाच्या अल्प कालावधीत तंत्रशिक्षण परिषदेची मुल्यांकन समितीने महाविद्यालयाला भेट दिली, तदनंतर कार्यलयीन कालावधीनुसार महाविद्यालय विलीनीकरण करण्याची मान्यता प्राप्त झाली आहे. महाविद्यालय विलीनीकरण झाल्यामुळे कार्यलयीन कामकाज सोयीचे होईल. कर्मचा-यांचा योग्य रित्या उपयोग होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा अधिक संपन्न करता येईल व विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देता येईल या मुख्य उद्देशाने समूहाने महाविद्यालयांचे विलीनीकरण केले असल्याचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी यांनी कळविले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९/२० मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात (कम्प्युटर डिपार्टमेंट) ६०, माहिती तंत्रज्ञान (इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) ३०, मेकेनिकल १२०, सिव्हील ६०, इलेक्ट्रिकल ६०, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन ६० अशा जागा भरल्या जातील, तसेच व्यवस्थापन महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एमबीए प्रथम १२० या नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल असे संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.