रायसोनीतील आदित्य भंगाळेची विद्यापीठ संघात निवड

0

जळगाव, दि. 1२ –
येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग व मेनेजमेंट मधील आदित्य अशोक भंगाळे या विद्यार्थ्याची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड झाली आहे. क.ब.चौ. उ.म.वि. अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे विद्यापीठ संघात या खेळाडूची निवड झाली आहे. निवड झालेला विद्यार्थी पदवीचे अभियांत्रिकीत शिक्षण घेत आहे.
नुकत्याच झालेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धा गोदावरी महाविद्यालय जळगाव येथे पार पडल्या. पुढील स्पर्धा मुंबई विद्यापीठ मुंबई याठिकाणी 11 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी संघ 11 रोजी रवाना झालेला आहे. विद्यापीठ संघात निवड झाल्यामुळे आदित्य भंगाळे या खेळाडूचे संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.ए.जी.मॅथ्यु, विभागप्रमुख प्रा.राकेश तिवारी यांनी अभिनंदन केले. त्यांना क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.