पाच रायातील भाजपच्या पिछेहाटीचा अन्वयार्थ

0

सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींची लाट होती. संपूर्ण भारतभर मोदींच्या प्रचार सभेला लाखोची उपस्थिती राहात होती. मोती, मोदीचा नारा- प्रचार सभेत घुमत होता. त्यामुळे एकट्या भाजपला 282 इतक्या जागा मिळाल्या. निवडणुक प्रचारात मोदींनी मोठ मोठी आश्वासने दिली. भारताचा देशाबाहेर असलेला काळा पैसा तातडीने भरतात आणण्याचा पहिला कार्यक्रम राहील.त्या काळ्याा पैशातून देशातील प्रत्ेकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्यात येतील. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकर्याांना विविध सवलती दिल्या जातील प्रत्येकाला घर दिले जाईल. गरीबी दुर केली जाईल आदि अनेक आश्वासन गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधित पूर्ण झाले नाही. पहिली चार वर्षेे पंतप्रधान मोदी यांचे परदेश दौर्याातच गेले. लोकसभा अधिवेशनात सुद्धा त्यांची उपस्थितीराहायची नाही. निवडणुक निकालानंतर आता भारतीयांना अच्छे दिन येतील असा नारा दिला. परंतु लोकांना अच्छे दिन पहायला मिळालेच नाहीत. मिळालेल्या पाशवी सत्तेुळे मोदींना एकप्रकारचा गर्व निर्माण झाला होता. मंत्रीमंडळातील सहकार्याांना तर ते किस झाडकी पत्ती असे समजायचे त्यामुळे नरेंद्र मोदीशिवाय दुसरा चेहरा पुढे आला नाही. पक्षातील येष्ंठ नेत्यांना खड्यासारखे बाजूला करून अडसर दुर केला. त्यामुळे सुद्धा भाजपात धुसफूस सुरु होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोघेच पक्ष चालवू लागले. अमित शहाचे व्यवस्थापन 2014 च्या निवडणुकीत उपयोगी पडले. सोशल मिडीयाचा भाजपला फार मोठा उपयोग झाला. त्यावेळी इतर पक्ष सोशल मिडियात कमालीचे मागे राहिले. त्यामुळेसुद्धा विरोधकांना पराभव पत्करावा लागला. ामोदिच्या करिष्म्याचा फायदा होईल या आशेने जनतेने मोदीच्या पारड्यात भरभरून मतदान केले. परंतु मोदी काही ठराविक उद्योजकांचे जे निर्णय घेतले त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोश ओढवला.
आज मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या रायात झालेल्या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचे सर्वत्र बोलले जात होते. या रायातील आज निकाल जाहीर झाले. त्यात पाचही रायात भाजपची सपशेल पिछेहाट झाली. या रायातील निवडणुक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला विशेष गर्दी झाली नाही. अमित शहांचेही तेच झाले मोदीआणि शहापेक्षाजास्त सभा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. त्यांच्या सभा या विकासाच्या मुद्यांऐवजी हिंदुत्वाच्या मुद्यावरच व्हायच्या. त्यामुळे हिंदुत्ववादीपेक्षा त्यांच्या सभेला इतर कुणी हजर राहात नव्हते. केंद्रात तसेच अनेक रायात भाजपची सत्ता असल्याने निश्चित शासकीय यंत्रणा वापरण्यात आल्या. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पाशवी बहमत मिळाल्यामुळे नरेंद्र मोदींना आकाश ठेंगने दिसायला लागले. विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस पक्ष किस झाडकी पत्ती असल्याच प्रचा ते करायला लागले. स्वतंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या मोलाचा वाटा असतांना आणि स्वातंत्र्यानंतर 50 वर्षे भारतात राजकीय सत्ता उपभोगणार्याा काँग्रेस पक्षाविषयी हि जनतेची वागणूक मोदींकडून दिली गेली. काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा मोदींनी केली. त्यांची ही घोषणा कुरालाही आवडली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सद्धा या घोषणेचे खंडण केले होते. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी पप्पू म्हणून हिणवणारी वक्तव्ये मोदी करू लागले. खलच्या पातळीवर जाऊन राहुल गांधीविषयी केलेले वक्तव्यही मोदींना महागात पडले. गांधी घराण्याचा भारतासाठी असलेला त्याग सर्वशृत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यंची देशासाठीच हत्या झाली. तरी सुद्धा एक चहावाला पंतप्रधान झाला यची ते शेरबी मिरवू लागले. आई – वडिलांचे मुद्दे मिरवू लागले. तेच तेच आरोप प्रत्यारोप करणारी भाषणे आतालोकांना कंटाळवाणी वाटू लागली. त्यामुळे मोदींचा करिश्मा हळुहळु ओसरू लागला आणि त्याचे प्रत्यंतर या पाच रायाच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले. कोणी काही विचारले तर त्याला उत्तर देणे हे मोदी टाळायचे. नवी दिल्लीत गेल्या साडेचार वर्षात शेतकर्याांच्या मागण्यासाठी भव्य मोर्चे निघाले. परंतु एकाही मोर्चाला ते सामोरे जाऊन त्यंचे म्हणणे ऐकून घेतले नाही. परंतु सिने अभिनेत्री प्रियंका चोपडा याच्या लग्न समारंभाला मात्र ते गेले. त्यांचे हे वागणे जनतेला आवडले नाही तरी सुद्धा नरेंद्र मोदींनी स्वत:मध्ये काही बदल केले तर ते उत्कृष्ट नेता होऊ शकतात. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 चा करिश्मा मात्र राहणार नाही एवढे निश्चित !

Leave A Reply

Your email address will not be published.