रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची केली जातेय कोरोना चाचणी

0

एरंडोल : शहरात रात्री ८ वाजेनंतर फिरणाऱ्यांची एरंडोल नगर पालिका व पोलीस प्रशासनातर्फे कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात रात्री आठ वाजे नंतर संचार बंदी लावण्यात आली आहे परंतु तरीही काही महाभाग या संचारबंदित बाहेर फिरतांना दिसत आहे.त्यामुळे एरंडोल नगर पालिका व पोलीस प्रशासनातर्फे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असून दिवसा देखील गर्दीच्या ठिकाणी फिरत्या कोरोना चाचणी पथकाद्वारे नागरिकांची चाचणी केली जात आहे.

यासाठी नगर पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी एस.आर.ठाकुर, प्रशासन अधिकारी विनोद पाटील, राहुल ठाकुर, भरत महाजन, मुकादम सुरेश दाभाडे, दिपक अटवाल, आरोग्य सेवक केशव ठाकुर, विशाल सासर,किशोर महाजन, किरण पाटील, दिपक सोईते, भुषण महाजन व पोलीस प्रशासना चे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,पोलीस कर्मचारी विलास पाटील,विकास खैरनार,संतोष चौधरी तसेच स्थानिक होमगार्ड पथकातील जवान परिश्रम घेत आहेत. सदर उपक्रमाचे सुज्ञ नागरीकांतर्फे कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.