दिलासादायक : आज १०३३ नव्या रुग्णांची नोंद तर ११०३ कोरोनामुक्त

0

जळगाव : जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.  आज जिल्ह्यात १०३३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आजच ११०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मात्र जिल्ह्यात मृताचा आकडा वाढताच आहे. आज पुन्हा जिल्ह्यात २० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ०७ हजार १०३ झाली आहे. त्यापैकी बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ९७६ वर गेली आहे. तर आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १८८८ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ११२३९ रुग्ण उपचार घेत आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-२१२, जळगाव ग्रामीण-५९, भुसावळ-१३०, अमळनेर-१०५, चोपडा-८७, पाचोरा-७९, भडगाव-१०, धरणगाव-५३, यावल-३०, एरंडोल-४९, जामनेर-१९, रावेर-८४, पारोळा -२७, चाळीसगाव-३७, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील २० असे एकुण १ हजार ३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.