राज्यातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

0

मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना पंतप्रधान मोदींना केली होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबतची इच्छा मोदींकडे व्यक्त केली होती. त्यानुसार आता महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.