जळगाव विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

0

जळगाव (प्रतिनिधी ) : लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आयोजनाबाबत फेरनियोजन केले जाणार असून नव्याने तयार केलेले सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने यापूर्वीचे वेळापत्रके रद्द समजण्यात यावे असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लाॕकडाऊन सुरू केलेले असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे मार्च /एप्रिल /मे २०२० मध्ये आयोजित येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचे यापूर्वी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक रद्द समजण्यात यावे. लाॕकडाऊन संपल्यावर शासनाच्या निर्देशानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे फेरनियोजन करून सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल याची नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.