राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

0

मुंबई, दि.३१ –

राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर याचं आज गुरुवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईतील सोमय्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बुधवारी श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने फुंडकर यांचं निधन झाले.

खामगाव येथे अंत्यसंस्कार
फुंडकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. फुुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
खंबीर नेता गमावला
पांडुरंग फुंडकर हे सलग तीन वेळेस अकोला लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. महाराष्ट्र विधानसभेवर १९७८ आणि १९८० साली निवडून गेले होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात २०१६ मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. भाजपाला ग्रामीण भागाता जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा राहिला आहे. फुंडकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक खंबीर शेतकरी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.