रवंजे येथे आगीत मका जळून खाक

0

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील रवंजे बू.येथील शेतातील मक्याला आग लागुन मका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रवंजे बू.येथील यशवंत राजधर कोळी यांच्या गट नं ४३/१ क्षेत्र ०४५ आर शेतात मका पेरलेला होता व नुकतीच त्याची कापणी करुन मक्याची कणसे त्याच ठिकाणी ठेवली होती व रात्री अचानक आग लागली व या आगीत सुमारे ४० क्विंटल मका अंदाजे किंमत ४० हजार असलेला जळून खाक झाला.याप्रसंगी तलाठी डि.आर.पाटील,पोलीस पाटील शरयू चौधरी,यांनी,कोतवाल आधार नन्नवरे, बाळू कोळी, संजय चौधरी,गणेश चौधरी यांच्या समक्ष पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.