रत्नागिरीत 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

0

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज राज्यात नव्या 121 रुग्णांची वाढ झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 92 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 455 वर पोहोचला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. आज धारावी झोपडपट्टी परिसरात 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे केईएम रुग्णालयातील 2 डॉक्टरांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत आज 92 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
त्याशिवाय रत्नागिरीत एका 6 महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.