युवा परिषदेच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पुढील १ वर्षासाठी जळगाव जिल्हा नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सदर जिल्हा कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे शासकीय नियमांचे पालन करुन निवडक लोकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रारंभी विद्या दयाराम कोळी यांनी सुरेल असे स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक सुनिल बाफना होते, तर प्रमूख पाहुणे म्हणून युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जावळे, दिव्या भोसले, जिल्हा महासचिव सागर महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष शुभम पाटील, जिल्हा सचिव आकाश पाटील, आकाश धनगर, कोमल पाटील, कुणाल कोल्हे या प्रमुख पदाधिका-यांसह जिल्हा समन्वयक योगेश चौधरी, धनश्री ठाकरे, किरण तायडे, इरफान पिंजारी, योगेश कोळी, गायत्री धांडे, सारांश सोनार, डॉ.नचिकेत पाटील, राहूल पाटील, माधुरी पाटील, मयुर पाटील, भावेश रोहिमारे, स्वप्निल निकम, निर्मल भालेराव, विद्या कोळी, नयनकुमार पाटिल, अश्विनी पाटील यांना नियुक्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन देखिल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल बाफना यांनी अध्यक्षीय भाषणातून युवा परिषदेच्या कार्याचे कौतूक केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जावळे यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक सारांश सोनार यांनी केले तर जिल्हा सचिव कोमल पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.