युती हो किंवा ना हो, पाचोरा विधानसभेचा मीच उमेदवार

0

भाजपाचे राज्य सदस्य डी. एम. पाटील यांनी दिले आर. ओ. पाटलांना थेट आव्हान

पाचोरा –
राज्यात लोकसभेसाठी युतीबाबत पदाधिकारी व जनतेमध्ये मोठा संम्भ्रम आहे. लोकसभेच्या युतीसाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असुन युतीबाबतचा निर्णय देश व राज्यपातळीवरील नेते घेतील. मात्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी युती होवो अथवा ना होवो पाचोरा – भडगाव मतदारसंघाचा भाजपाचा उमेदवार मीच दावेदार आहे. अशी माहिती भाजपाचे राज्य सदस्य तथा माजी जि. प. सदस्य दिलीप मुकुंदराव (डी. एम.) पाटील यांनी त्यांच्या अभियंता नगर मधील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेचे दिली. मागील काळात माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी युती झाली किंवा नाही झाली तरी जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार मीच असेल असा दावा केला आहे. डी.एम. पाटील यांनी एकप्रकारे आर. ओ. पाटील यांना अप्रत्यक्षरित्या पत्रकार परिषदेद्वारे आव्हान केले आहे. विधानसभा निवडणुक लढविणेसाठी माझी पुर्ण तयारीही झालेली असल्याचेही डी. एम. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पाचोरा विधानसभा निवडणुक लढविण्याच्या दृष्टीकोनातून भडगाव शहरासह दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबुतीसाठी व केलेली विकासकामे जनतेसमोर मांडण्यासाठी मी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुथ प्रमुखांचे मेळावे घेऊन पाच ते सहा बुथ मागे एक शक्ती प्रमुखाची नेमणुक केलेली असुन भाजपाचे चिन्ह व कामे घराघरा पर्यंत पोहचविण्यात आलेली आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचाच उमेदवार विजयी होणार असल्याची ग्वाही यांनी देवुन या मतदार संघातुन भाजपाचा स्वतंत्र उमेदवार राहणार असल्याने या जागेसाठी मी दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दृष्टीकोनातून माझी पुर्ण तयारी झाल्याचे सांगुन मला वरिष्ठ स्तराहुन मला आश्वासन मिळाले असल्याचे ते म्हणाले. मात्र वरिष्ठ पातळीवरुन नेमके कोणाचे आश्र्वासन मिळाले आहे याबाबत विचारले असता त्यांनी ते सांगण्याचे टाळले. पाचोरा मतदारसंघातून भाजपातर्फे युवानेते अमोल शिंदे, भाजपाच्या डॉक्टर्स न असोशियशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, डॉ. उत्तमराव महाजन, सिनेट सदस्य अमोल पाटील, माजी सभापती सुभास पाटील, सभापती बन्सीलाल पाटील, शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी सह पाचोरा – भडगाव तालुक्यातुन संभाव्य जण उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र निवडणुकीच्या सहा महिणे आधीच डी. एम. पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन उमेदवारीचा पोळा फोडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.