पाचोरा आगाराच्या बसमध्ये स्टेपनी नसल्याने प्रवाशी ताटकळले तासभर

0

पाचोरा –
पाचोरा आगाराची बस दि. 11 रोजी जळगांवहुन पाचोर्‍याकडे येत असताना हडसन ते नांद्रा दरम्यान पंन्चर झाली मात्र या बसमध्ये स्टेफनीच काय परंतु पंन्चर झालेले चाक खोदण्यासाठी साधा पान्हाही नसल्याने तीस ते चाळीस प्रवाशांना भर उन्हात ताटकळत रहावे लागल्याने संत्तप्त झालेल्या प्रवाशांनी आगार व्यवस्थापकास नाराजी व्यक्त करुन निवेदन दिले. पाचोरा आगाराची बस (क्रमांक एम.एच.20 बी. एल. 1836) ही बस जळगांवहुन पाचोर्‍याकडे येत असताना हडसन गावाजवळ पंन्चर झाली. सद्यस्थितीत चांदवड – जळगांव महामार्गाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना सुमारे तासभर तळपत्या उन्हात धुळखात बसावे लागले. पाचोरा आगारातुन मालवाहतुक बसमध्ये स्टेफनी आणल्यानंतर पंन्चर काढावे लागले. पंन्चर काढल्यावर बस सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत विवाहाची मोठी लगबग असल्याने अनेकांना लग्नसमारंभास वेळेवर जाता आले नाही. बस मधील सतर्क असलेले प्रवाशी निरंजन प्रकाश पाटील यांनी आगार व्यवस्थापक पाचोरा यांना लेखी निवेदन सादर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.