‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

0

हैदराबाद : तेलंगणातील के चंद्रशेखर राव  यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच रविवार 20 जूनपासून तेलंगणामध्ये सर्वकाही सुरु राहील. इतकंच नाही तर तेलंगणामध्ये ना नाईट कर्फ्यू , ना वीकेंड लॉकडाऊनचे नियम असतील. सरसकट संपूर्ण लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारं तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

तेलंगणातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर, तेलंगणा सरकारने तिथला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला.

तेलंगणातील कोरोनाची सद्यस्थिती

तेलंगणामध्ये शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 1417 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्यचे आकडा 6,10,834 इतका पोहोचला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं पाहून, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.