जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व साईओ वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते 47 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान

0

किनवट : ( प्रतिनिधी ) ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006, 2008, 2012 ) ” अंतर्गत किनवट तालुक्यातील 47  लाभार्थींना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रशिक्षणार्थी आय.ए. एस. कार्तिकेयन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व उप विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष कीर्तीकिरण एच.पूजार, जि.प. सदस्य मधुकर राठोड, पं.स सदस्या तथा वनहक्क समिती अशासकीय सदस्या सुरेखा सुभाष वानोळे यांच्या हस्ते उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवार (दि.17) रोजी वन हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मागील पिढीपासून अनेक हालअपेष्टा सहन करत जंगल जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी,वननिवासी दावेदारास विनाविलंब वनहक्क प्राप्त करून याद्वारे त्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी ” पारंपारिकरित्या वनांवर किंवा वनजमिनीवर खर्‍याखुर्‍या गरजांसाठी किंवा उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा, वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावी, अशी वनहक्क कायद्यात तरतूद आहे. याचे तंतोतंत पालन करून वन हक्क मान्य करून त्यांना वनहक्क प्रमाणपत्र, भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी व सातबारा प्रदान करण्यात आले. या प्राप्त झालेल्या प्रमाण पत्राच्या आधारे त्यांना आता विविध शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यावेळी तहसिलदार अनिता कोलगणे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, नायब तहसिलदार एन.ए. शेख, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, समन्वयक के.एम. पटणे, लक्ष्मीकांत ओबरे, श्रीरंग कांबळे, वनपरिक्षेत्राधिकारी किशन खंदारे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.