मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पक्षाचा आगार व्यवस्थापकांना घेराव

0

– ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याची केली मागणी

मुक्ताईनगर : लॉक डाऊन च्या नियमांमध्ये शिथिलीकरण केल्यानंतर देखील मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागात बसेस पूर्ववत सुरू न केल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक यांना घेराव घालत निवेदन देऊन तत्काळ ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याची मागणी केली. तालुकास्तरावर तहसील पोलीस स्टेशन कोर्ट व दवाखान्याच या सारख्या प्रमुख कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मुक्ताईनगर येथे यावे लागत आहे परंतु बहुतांशी भागात बसेस सुरू नसल्याने खाजगी वाहने करून अव्वाचे सव्वा भाडे नागरिकांना द्यावे लागत आहे. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली ,रावेर ,फैजपूर, पिंपरीनांदू मार्गे अंतुर्ली

कुऱ्हा- काकोडा यासारख्या बसेस नियमित सोडण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी आगार व्यवस्थापक एस बी साठे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस डॉक्टर जगदीश पाटील,शरद तुकाराम महाजन, दिनेश सोपान पाटील ,अनिल सेनु वाडीले, नामदेव मिठाराम भोई, शहराध्यक्ष पवन खुरपडे मागासवर्गीय सेलचे बी डी. गवई, माजी तालुका अध्यक्ष एडवोकेट अरविंद गोसावी, शिवाजी पाटील, एडवोकेट राहुल पाटील, प्राध्यापक सुभाष पाटील , प्रकाश रोटे ,गजानन पवार ,राजू जाधव, संजय चौधरी, काशिनाथ पाटील,भैय्या शेख यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.