यावल शहरातील अनेक समस्या व भ्रष्टाचाराची चौकशी करा

0

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल  शहरातील अनेक समस्या उदभवल्या असून यावल शहरातील नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभार चालु आहे. गेल्या पाच वर्षात यावल नगरपालिकेने करामध्ये वाढ केली आहे.  प्रत्यक्षात सुविधांचा अभाव आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत नाही. स्वच्छतेसाठी महिन्याला न. पा. लाखो रूपये खर्च करूनही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे साथीचे आजार शहरात पसरत आहे. प्रशासन व कर्मचारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही त्यांचा मनमानी कारभार चालु आहे.

प्रशासन व कर्मचारी यांना विश्वासात होऊन शहराच्या विकासासाठी नियोजन होत नाही. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नाही. याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. शहरात नगरपालिकाकडून जी विकासकामे झाली आहे. त्या सर्व कामाची गुणवत्ता व दर्जा याकडे दुर्लक्ष झाले आहे.

शहरातील विस्तारीत भागात रस्त्यांची पुर्णवाट लागली आहे. खड्डेमय रस्त्यातून जातांना नागरिकांचे अनेक आजार जडले आहे. शहरातील प्रत्येक विस्तारीत भागात नाला, गटारी नसल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. तसेच शहरामध्ये पुर्ण पणे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तरी यावल नगरपालीकेची भोंगळ कारभाराची चौकशी करावी अशी मागणी  मनसे जिल्हा अध्यक्ष जनहित चेतन अढळ कर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.  तसेच  निवेदनावर किशोर नन्नवरे, गौरव कोळी, श्याम पवार, विपुल येवल, आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.