यावलमध्ये सांडपाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

0

यावल :– येथील मिनीडोअर स्टॉप जवळ तथा भुसावळ रोडवर यावल तालुका शेतकरी सहकारी संघाचे व्यापारी संकुलाजवळ व्यापारी संकुलनाचे सांडपाण्याच्या टाकीत दि. २४ रोजी दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख पटली असून कमलबाई भगीरथ महाजन (वय ६०) राहणार धानोरा तालुका चोपडा असे मृत महिलेचे नाव आहे.

तालुका शेतकरी संघाच्या व्यापारी संकुलनाच्या पूर्वेस असलेल्या गटारीला लागून व्यापारी संकुलनाची सांडपाण्याची भूमिगत एक सांड पाण्याची टाकी आहे. त्या टाकीला झाकण लावण्यासाठी दीड बाय दीड आकाराची जागा, झाकण लावण्यासाठी सोडली आहे मात्र त्या टाकीवर गेल्या दहा वर्षात झाकण न बसविल्याने त्यात ती महिला पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत रहदारीचा व वर्दळीचा भाग असल्याने रविवार दि. 24 रोजी उघड्या टाकीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी डोकावून पाहिले असता त्यात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

याबाबत वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांचे सहकारी पोलीस, यावल पालिकेचे साफ सफाई कर्मचारी दुर्गादास चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह धानोरा येथील कमलबाई महाजन यांचा असल्याचे निष्पन्न झाले मृत महिलेचा नातू आकाश महजन याने यावल ग्रामीण रुग्णालय गाठुन ओळख पटवली आहे, तुर्त सुधाकर पुंजा भिल यांच्या माहितीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली पुढील तपास हे.कॉ. गोरख पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.