…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्याने केलेल्या गौप्यस्फोटाने उडाली खळबळ

0

मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनीदेखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जातं आहे. याबाबत बोलताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षआ उमा खापरे यांनी म्हंटले आहे की, ‘धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘रेणू शर्मा यांनी जरी तक्रार मागे घेतली असली तरी भाजपने मात्र यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता, असे त्यांनी म्हंटले आहे.

‘आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे उमा खापरे यांनी म्हंटले आहे.

‘…म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते’

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.