….म्हणून ‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’ विरोधात एफआयआर दाखल

0

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  या टीव्ही शोमधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्याविरोधात हरियाणाच्या हंसी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनमुनने आपल्या व्हिडीओमध्ये एका विशिष्ट जातीबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नुकताच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी अभिनेत्रीविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या आधी मुनमुनविरोधात पौरी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही तक्रार दिली असून, अभिनेत्रीविरोधात कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.नॅशनल अलायंस फॉर दलित हुमन राइट्सचे संयोजक रजत कलसन म्हणाले की, “अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिने केवळ आम्हाला नीचा दाखवण्यासाठी असे म्हटले आहे.” मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही काळापूर्वी मुनमुनने आपल्या एका व्हिडीओमध्ये विशिष्ट जातीबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली

Leave A Reply

Your email address will not be published.