मोर्शी पं.स.वर शालेय पोषण आहार कामगारांचे प्रचंड धरणे व निदर्शने आंदोलन

0

अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मध्यान्न भोजन योजनेचे पैसे विद्यार्थ्यांचे खात्यात टाकण्याचा (DBT) निर्णय मागे घेवून कामगारांना जैसे थे कामावर ठेवा , १८ रू.हजार दरमहा मानधन द्या, कामगारांना कामावर कायम ठेवून कामगार म्हणून मान्यता द्या , करोना काळात १० रू. पॅकेज द्या, वाढती महागाई कमी करा इत्यादी प्रश्नासाठी जोरदार धरणा निदर्शने आंदोलन मोर्शी पंचायत समीती कार्यालय तसेच तहसिल कार्यालयावर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटना ( सिटू ) मार्फत  करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव गारपवार , दिलीप शापामोहन यांनी केले. वरील मागण्या .संदर्भात जोरदार घोषणा देवून परीसर दणानून सोडला. सतत 2 तास चाललेल्या या आंदोलनाचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र यांना खंडविकास अधिकारी यांचे सादर केले. या आंदोलनात शेकडो महीला पुरूष कामगार मोर्शी तालुका मधून सहभागी झाले होते.

या मधे चंदा पंडागडे, प्रशांत कोकने, अर्चना म्हाला, सुनीता गांजरे , योजना कडू, अरूणा परतती , सुष्मा उईके , मंदा कोहळे, सुनीता खडसे, भुषण इंगळे, सारीका कुकडे, रेखा वाघाडे ,झ्त्यादी महीला मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शेवटी सिटू जिंदाबादचे घोषणेत आंदोलन संपवीण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.