मोदींच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं लोकार्पण

0

गांधीनगर, दि. ३१ –

भारताचा अभिमान ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं आज अनावरण झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातल्या या सर्वात उंच पुतळ्याचं लोकार्पण झालं. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
उद्यापासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं होईल. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहिला आहे.
संपूर्ण ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायची असेल तर त्याचा तिकीट दर 500 रुपये आहे. इथे गेल्यानंतर पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 3 किमी लांब अंतरावर वाहनं पार्क करावी लागतील. तिथून एका बसद्वारे स्मारकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.
वल्लभभाईंना तरी कसे पटेल?

राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे राम सुतार यांनी मूर्ती साकारलीपंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनीने केलं आहे. यानंतर एल अँड टीने पुतळा साकारण्याची जबाबदारी वयाची नव्वदी पार केलेले मराठमोळे चिरतरुण मूर्तीकार राम सुतार यांच्या खांद्यावर सोपवली. ब्राँझच्या आठ मिमी जाडीच्या 7000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याला एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे. जवळच अडीचशे माणसं एकाच वेळी बसू शकतील असं फूड कोर्ट उभं राहत आहे. याशिवाय आजूबाजूच्या भागातही आणखी काही संकल्पनांवर काम करुन एक संपूर्ण पर्यटन केंद्र उभारण्याचा मानस आहे.
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमागील राजकारण
पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टची जितकी भव्यता आहे, तितकीच त्यामागील राजकारणाची पार्श्वभूमीही. या पुतळ्याची उंची आणि गुजरातमधील विधानसभा मतदारसंघांची संख्या समान आहे. हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे पटेल समाज दुरावला आहे. सरदार पटेलांचा हा भव्य पुतळा पटेल समाजाला चुचकारण्याचं भाजपचं शस्त्र आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.