मोठी बातमी.. ‘या’ दिवशी सुरु होणार राज्यातील महाविद्यालये

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनेक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, महाविद्यालये सुरु करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50 टक्केपेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

कोरोनाची परिस्थिती पाहता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांची नियमितपणे ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अशी असेल नियमावली –

1. विद्यार्थ्यांनी शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली भरणे आवश्यक असेल.

2. शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे.

3. शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर असावे.

5. शाळेत येताना शाळेतील कर्मचा-यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजावे.

6. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करणे आवश्यक असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.