मोठी बातमी.. भारतात ‘गुगल’ची Gmail सेवा ‘डाऊन’

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपूर्वी जगभरात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. इंटरनेट विश्वासातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या Google ची Gmail सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात काही ठिकाणी जीमेल वापरण्यास काही तांत्रिक अडचणींना वापरकर्त्यांना सामोरं जावं लागत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युझर्सला जीमेलवरुन कोणताही मेल पाठवता येत नाहीय. यासोबत मेल देखील इनबॉक्समध्ये येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ट्विटरवर #GmailDown टॉप ट्रेंडवर आहे. यूजर्स ट्विट करत आपली समस्या मांडत आहेत.

जीमेल सेवेचा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. खासगी कामांपासून ते कार्यालयीन कामांपर्यंत Gmail चा वापर केला जातो. जीमेल डाऊन झाल्याचा मोठा फटका भारताला बसला आहे.

ईमेल पाठवण्यास समस्या

Gmail वापरण्यास भारतातील काही भागातील यूजर्सला समस्या येत आहे. ईमेल पाठवण्यास अडथळा येत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, ६८ टक्के यूजर्सने वेबसाइटमध्ये समस्या येत असल्याची माहिती दिली आहे. १८ टक्के यूजर्सनी सर्व्हर कनेक्शन आणि १४ टक्क्यांनी लॉग इन समस्या येत असल्याची माहिती दिली आहे.

‘गुगल’कडून अद्याप स्पष्टीकरण नाही

Down Detector वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ६८ टक्के यूझर्सनं जीमेलच्या वापरात अडचणी येत असल्याची तक्रार नोंदवली आहे. देशभरातील जवळपास १८ टक्के वापरकर्त्यांनी जीमेल डाऊन झाल्याची तक्रार दिली आहे. तर १४ टक्के वापरकर्त्यांनी जीमेल लॉगइन करण्यात अडचणी येत आहेत. भारतात अनेक युझर्स जीमेल डाऊन झाल्याची माहिती सोशल मीडियातही देत आहेत. दरम्यान गुगलकडून जीमेल डाऊन झाल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.