मोठी बातमी : जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोखवर काढले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगावात शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे. तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन दिवशी जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले. यानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार आहे. हा जनता कर्फ्यू 11 मार्च रोजी रात्री आठ वाजता पासून सुरुवात होऊन 15 मार्च रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून प्रस्तावावरून हा तीन दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केले आहे. हा जनता कर्फ्यू फक्त तीन दिवस राहणार असून नागरिकांनी साठेबाजी करू नये असे आवाहन केले आहे

 

हा जनता कर्फ्यू जळगाव शहरात पालन करण्यात येणार असून व्यापारी व जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी, शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांची उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.