बोदवड महाविद्यालयाच्या डॉ. रुपेश मोरे यांचे निबंध स्पर्धेत यश

0

बोदवड – स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यापीठ स्तरीय खुली ऑनलाईन निबंध स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.या स्पर्धेचा निकालाअंती बोदवड महाविद्यालयाचे डॉ. रुपेश मोरे यांनी तृतीय पारितोषिक प्राप्त केले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत तसेच स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि आशा फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने खुली निबंध स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येऊन त्यात डॉ.रूपेश मोरे यांनी  “आत्मनिर्भर भारत आणि स्वामी विवेकानंद” या विषयावर निबंध सादर केला होता.डॉ.रूपेश मोरे यांनी विविध महापुरुषांची जीवनचरित्रावर,विविध नामवंत  वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. यशाबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहूलीकर, बोदवड महाविद्यालयाच्या   संस्थेचे चेअरमन श्री.मिठूलालजी अग्रवाल,सचिव श्री.विकासभाऊ कोटेचा,प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी,स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्राचे संचालक डॉ.मनिष जोशी,आशा फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्री.  गिरीश कुलकर्णी तसेच व्यवस्थापिका सौ.सुजाता बोरकर,बोदवड तसेच  महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी,मित्रमंडळी,पत्रकार संघ यांनी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.