मोठा मारुती जन्मोत्सव पूजा अभिषेक करून साजरा

0

फैजपूर (प्रतिनिधी) शहरातील पुरातन जागृत देवस्थान म्हणून धोबी वाड्यातील मोठा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात मंगळवारी हनुमान जन्मोत्सव सकाळी सहा वाजता जल, दूध अभिषेक पूजन आरती करून  माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भाजपा गटनेते मिलिंद बापू वाघुळदे यांचे हस्ते करण्यात आले.

कोरोना महामारी नष्ट व्हावी. जनजीवन सुरळीत सुरु रहावा, सर्वाजण  सुखी समाधानी रहावे अशी प्रार्थना माजी नगराध्यक्ष यांनी प्रार्थना केली. पुरोहित नंदू महाराज, दिनेश जोशी यांनी धार्मिक विधिवत पूजन केले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.कोरोना नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने  गर्दी न करता, मास्क चा वापर करून साजरा करण्यात आला. कोरोना महामारी नष्ट व्हावी.

मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, बंडूशेठ माहूरकर, प्रणव माहूरकर, चिराग गुजराथी, राजू भोई, मसाका कामगार संघटना अध्यक्ष किरण चौधरी,भाजपा शहरअध्यक्ष अनंता नेहेते, डी के मोरे  व  भाविकांनी घेतले दर्शन यावेळी रमेश गलवाडे, विलास काठोके, रणजित राजपूत, कैलास चौधरी, संजू धोबी,धोंडू सोनवणे, विवेक चौधरी, शिवा रावते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.