मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, जाणून घ्या ताजे दर

0

मुंबई : डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील  सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव 46737च्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे, मे महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत 1023 रुपयांनी वाढ झाली आहे.

या आठवड्याच्या अखेरच्या व्यापार सत्रात ऑगस्टच्या सोन्याचा भाव 231 रुपयांच्या वाढीसह 48150 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. हे दर स्पष्टपणे दर्शवतात की, आगामी काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कमोडीटी मार्केटमधील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे डॉलर सातत्याने कमकुवत होत आहे, म्हणूनच त्याला गती प्राप्त होत आहे. डॉलर निर्देशांक 30 एप्रिल रोजी 91.27वर होता, जो या आठवड्यात 90.21वर बंद झाला. अशा प्रकारे मेमध्ये तो 1.06 अंकांनी खाली आला आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची घट आणि घसरण हे निर्देशांक दर्शवते. जेव्हा डॉलर घसरतो तेव्हा सोन्याच्या किंमती वाढतात.

आयबीजेए आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर

आयबीजेए (IBJA) वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 47484 रुपये आणि चांदीचा दर (Silver Rate) प्रति किलो 70835 रुपये होता. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, एमसीएक्सवर जुलैच्या डिलिव्हरीसाठी चांदी 181 रुपयांनी घसरून 71500 आणि सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदी 466 रुपयांनी घसरून 72235 रुपये प्रतिकिलोवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1832 डॉलर व चांदी 27.55 डॉलरवर बंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.